वलयांकित क्रिकेटपटू - सचिन तेंडुलकर शारदाश्रमचा शाळकरी मुलगा. त्रिशतकांची माळ लावून क्रिकेट क्षितीजावर अवतरला. १९८६ मध्ये त्याने विनोद कांबळीसह ६६४ धावांची नाबाद भागीदारी करून विश्वविक्रम रचला. शाळकरी सचिनची विश्वविक्रमाची हाव निवृत्त होईपर्यंत कायम राहिली. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याचा सलामीच्या मालिकेत सुनील गावसकरने निधड्या छातीने सामना केला. ब्रॅडमॅनचा २९ शतकांचा विक्रम आणि १०,००० धावांची वेस प्रथम ओलांडण्याचा मान गावसकरनेच पटकावला. कणखर शरीरयष्टीचा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज कपिल देव. भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार. त्याला आदर्श मानून भारतात वेगवान गोलंदाजांचं अमाप पिक आलं. त्याची चवदार फळं अलिकडे मिळत आहेत.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : आदिनाथ हरवंदे (Adinath Harvande)
Binding : Paperback
ISBN No : 9788195142767
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 318gms
Width : 21.3
Height : 14
Length : 1.2
Edition : 1
Pages : 288