आता आणखी एक कूट रचायचा प्रयत्न हा लेखक करतो आहे, त्यातील पहिली कादंबरी ही ‘भिंतीवरचा चष्मा’ यात मिरोलँड नावाचा एक प्रदेश आहे. शिवाय सौम्य नावाचा एक इसम आहे. त्याची बायको सावली वारल्यानंतर तिच्या आठवणीत तो खूप दूर देशाच्या इशान्येला मिरोलँड मध्ये एका केंद्रीय विद्यापीठात नोकरीवर आला आहे. पण ही काही फक्त सौम्य ची गोष्ट नाहीय. कारण सौम्य च्या मानेवर सावली च भूत आहे. खरंखुरं भूत. शिवाय शेतीची थोडीफार अभ्यासक आणि प्रत्यक्षातही शेती सुरू केली आहे गंधाली नावाची बाई यात आहे स्वतंत्र मोरो राष्ट्राच स्वप्न पूर्वी पाहिलेले मेतोर वायलो यात आहेत. त्यांची सून किम आहे किम चा अचानक गायब झालेला नवरा तिच्या आठवणीत आहे. कादंबरी उघडावी की नको असा विचार करत असाल तर, असच पाठबळ दयायला गोष्टीतल्या थोड्या लोकांची किंचित ओळख सांगितली.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging