या घाटवाटांवर आजही आधुनिक वाहतुकीचा मागमुसही नाही. अशा अनेक वाटांचा धांडोळा आनंद पाळंदे यांच्या चढाई उतराई या पुस्तकात घेतला आहे. कधी रौद्र कड्यांची संगत, कधी दिवसा अंधार पडतो अशी निबिड अरण्ये, कधी फुललेले पुष्पमंडित कातळसडे, कधी भन्नाट वारा झेलत पाहिलेल्या रांगांमधून रांगा, कधी नितळ पाण्याचे डोह आणि कधी पावसातील मुसळधारांचा अनुभव पाळंदे यातील यात्रांमधून घडवतात. तरुण तरुणींना हे पुस्तक घ्यावे, वाचावे आणि धाडसाच्या अद्भूत दुनियेसाठी सज्ज व्हावे, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यात पुरेसे मार्गदर्शन आहेच. पण, सात-आठशे मीटर उंच खडतर चढाई-उतराई करण्याचीही तयारी करावयास हवी. हे येरागबाळांचे काम नोहे !
महाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत त्यामधील जाण्याचे मार्ग, घाटांचे एतिहासिक अवलोकन आणि सह्या्द्रीतील सर्व २२३ घाटवाटा – खिंडी / बारी / पाजा यांची संपुर्ण यादि सह हा सह्यभटक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपुर्ण ग्रंथ आहे.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging