Description
लेखक श्री. फडणवीस यांनी या पुस्तकात केवळ हरिपाठाच्या अभंगाचे शब्दशः विवरण न करता दृष्टांताद्वारे म्हणजे गोष्टीरूपाने आतील महत्त्वाचे सिध्दान्त सोप्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच श्री. फडणवीस हे योग शिक्षक व ध्यान धारणेचे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या विवरणात योग ध्यान इ. चे विवेचन अधिक प्रमाणात आहे.
गोष्टीरूप हरिपाठात श्री. फडणवीसांचे अवांतर वाचन व सोशल मिडियाशी असलेली घनिष्ठता लक्षात येते. गोष्टींचा संग्रह हे त्यांचे विशेष आहे. कोणतीही कठीण गोष्ट सोप्या गोष्टीच्या माध्यमातून सांगितली की ती चटकन लक्षात येते. हा आपला नेहमीचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी हरिपाठाचे सुंदर असे निरूपण केले आहे. श्री. फडणवीसांचा आणखी एक विशेष या पुस्तकात लक्षात येतो तो म्हणजे त्यांचा इतर संत वाड्:मयाचा असलेला अभ्यास. तुकाराम महाराज, समर्थ रामदास यांचे जागोजागी त्यांनी दिलेले दाखले याची साक्ष पटवितात.
Additional Information
Publication : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House ) Author : अनिल म फडणवीस ( Anil M Fadanvis )
Binding : Paperback
ISBN No : 9788195777839
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 200 gms
Size : 21 * 14 * 1
Edition : 2
Pages : 202