मी शेकडो कथा लिहिल्या नि त्या मराठी वाचकांना आवडल्या. माझं पुष्कळ कौतुक झालं. परवा महाराष्ट्र राज्य सरकारनं माझ्या 'फकिरा'ला पारितोषिक दिलं. याचा अर्थ माझी साहित्य सेवा महाराष्ट्राचे चरणी रुजू झाली आहे.
"तुम्ही कथा कशा लिहिता ?" असा एक प्रश्न एका रशियन मासिकानं मला विचारला होता आणि तशाच अर्थाची मला माझ्या वाचकांकडून अनेक पत्रं आली आहेत. त्यांचं संपूर्ण उत्तर मी इथं देत नाही. मात्र एवढं सांगेन की माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात, जगाला जगवतात.. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज नि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रूप करणं मात्र मला आवडत नाही. नव्हे मला भीती वाटते. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितानं आपल्या तळहातावर पेलली आहे, असं मी म्हणतो. अशा माणसांना वैफल्याच्या नावाखाली विद्रूप करू नये असं माझं मत आहे. वैफल्य हे तलवारीच्या धुळीसारखं असतं नि ती धूळ झटकून तलवार लखलखीत करता येते.
मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही.
Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स (Pratima Publication)
Author : अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)
Binding : Hardcover
ISBN No : 9788195820368
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 914 gms
Width : 15
Height : 3.9
Length : 22.5
Edition : 4
Pages : 831