Description
समाजापासून दूर ठेवलेल्या, तसेच साहित्य आणि संस्कतीचा कोणताही वारसा नसलेल्या जातीत आण्णाभाऊंचा जन्म झाला. मागासलेपणाबरोबर शिक्षणही नाही. दारिद्र्यही त्याबरोबर ओघाने आलेच. अशा परिस्थितीत कोणताही माणूस खचून जावा. पण आण्णाभाऊंचे तसे झाले नाही. समाजातील विषमतेमुळे त्यांचे मन पेटले होते. त्यांची आर्थिक स्थिती तशी फारशी कधीच सुधारली नाही. तरी पण समतेसाठी ते सतत लढत राहिले. त्यांची विचारसरणी कोणती का असेना, परंतु समतेच्या लढ्यातील ते एक पाईक होते हे विसरून चालणार नाही. आण्णाभाऊ आयुष्यभर झिजले. त्यांनी खस्ता खाल्ल्या. कठीण परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. शिक्षण नसतानाही दर्जेदार साहित्य निर्माण केले.
व्यक्ती म्हणून आण्णाभाऊंबाबत सर्वांनाच कुतूहल वाटते. हा माणूस कसा होता हे समजून घेण्याची इच्छा कोणालाही असणारच. याला कारण आण्णाभाऊंचे वेगळेपण. मागास जातीतला साहित्यिक म्हणून उपेक्षित. दलित साहित्यिक म्हणून त्यांचे हयातीत त्यांना मानाचे पान कधी मिळाले नाही. आर्थिक पिळवणुकी विरुद्ध झगडणारा हा माणूस प्रकाशकांकडून आर्थिकदृष्ट्या पिळला गेलेला. इतकेच नव्हे तर मृत्यूनेही शेवटी आण्णाभाऊंची उपेक्षाच केली.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : शंकर भाऊ साठे ( Shankar bhau Sathe )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914660
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 135
Width : 22
Height : 0.5
Length : 14
Edition : 03
Pages : 136