'गणिती' हा वाचनीय ग्रंथ सर्वसाधारण वाचकांसाठी गणिताच्या इतिहासाचा पट सुंदरपणे उलगडून दाखवतो; या लक्षवेधक इतिहासातून अवगाहन करत असताना, ते गणित निर्माण करणाया महत्वाच्या मोठमोठ्या गणितज्ज्ञांच्या विविध घटनांनी भरलेल्या जीवनाशीही वाचकाला पूर्ण असा चांगला परिचय होत जातो. यातूनच गणिताच्या अतिरथी-महारथीमध्ये गणिताचा बादशहा कोण, गणिताचा शापित यक्ष कोण, निर्धन असूनही गणिताची श्रीमंती अंगाखांद्यांवर मिरवणारा गणिती कोण, जगाला कोडी घालणारा गणिती कोण, गणिताचा शिल्पकार हे बिरूद समर्थपणे पेलणारा गणिती कोण, प्रज्ञावंत असूनही विनम्र राहणारा गणिती कोण, गणितीमधल अतिसुप्रसिद्ध घराणं कोणतं, गणिताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी ज्यांची नावं लिहिता येतील असे गणिती कोणते या संबंधातलं ज्ञान वाचकाला होत राहतं व तो अतीव गोडीनं पुढेपुढे वाचतच राहतो. त्याचप्रमाणे गणिताच्या या इतिहासाबरोबर गणितातील काही महत्त्वाच्या प्रमुख विषयांचं आजकालच्या दिवसांत सर्वसाधारण व्यक्तीला जेवढं ज्ञान आवश्यक आहे. तेवढं ज्ञानही हे पुस्तक समर्थपणे देत राहतं. अशा तऱ्हेनं गणिताच्या इतिहासाविषयीची आस्था व कुतूहल वाढवत गणिताच्या आवश्यक तेवढ्या प्राथमिक ज्ञानाचा काही भाग सुलभपणे देणारं हे पुस्तक सर्वांना आवडलं, तर त्यात नवल ते काय!
- डॉ. व. ग. टिकेकर, निवृत्त प्राध्यापक व गणित विभाग प्रमुख, आयआयएससी, बेंगळूरू,
- डॉ. व. ग. टिकेकर, निवृत्त प्राध्यापक व गणित विभाग प्रमुख, आयआयएससी, बेंगळूरू,
- Book Name : गणिती ( Ganiti)
- Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan)
- Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
- Language : मराठी ( Marathi )
-
Binding : Paperback
- ISBN No : 9789391629885
- Weight : 496gms Dimensions : 21.4*14*2.4
-
Pages : 527 Edition : 1