-10%

सहोदर (Sahodar)

Rs. 380.00 Rs. 342.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock
सहोदर - साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक प्रयत्न ‘सहोदर’ या साहित्य समीक्षा ग्रंथामध्ये घेतलेला आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘सहोदर’ या ग्रंथाचे नाव खूप बोलके आहे. या तीन साहित्यिकांची वाचक-अभ्यासकांच्या मनातील प्रतिमा कोणती आहे? तर, आरती प्रभु-ग्रेस आणि जी.ए. हे अज्ञाताचे स्वामी म्हणून नावाजलेले प्रतिभावंत या तीन निर्मात्यांच्या लेखनप्रेरणांमधील समानता शोधण्याचा प्रयास ‘सहोदर मध्ये केलेला आहे. या निर्मात्या त्रयींच्या निर्मितिशक्तीमागे कार्यरत असणाऱ्या समान प्रेरणांचा वेध घेण्याचा अखंड, अविरत प्रयत्न माधवी वैद्य सातत्याने करीत आहेत. निरंतर कालप्रवाहाशी जोडलेल्या मानवी जीवनाचा अर्थ लावणाऱ्या आरती प्रभु, ग्रेस, जी.ए. यांच्या साहित्यकृतींशी संवाद साधत त्यामागचे कृष्णविवर उकलण्याचा प्रयत्न माधवीताई पंचवीस-तीस वर्षे करीत आहेत. कुणा एका लेखकाची ‘मनबाधा’ लागल्याने त्याच्या साहित्यकृतींना पंचवीस-तीस वर्षे सतत छेडणे, हे एकवेळ समजू शकते. पण कालप्रवाही मानवी जगण्याला प्रतिभेच्या कक्षेत आणू पाहणाऱ्या तीन प्रतिभावंतांना पुन्हा पुन्हा समजून-उमजून घेण्यासाठी पंचवीस-तीस वर्षे झटणे, हे दचकण्यासारखे आणि चांगल्या अर्थाने भयानक वाटण्याजोगे आहे. त्यांच्या या अजोड साहसाचे मनःपूर्वक कौतुक तर केले पाहिजेच, पण त्याचबरोबर आदराने नमस्कारही केला पाहिजेच. ‘सहोदर’ या आरती – प्रभु – ग्रेस जी.ए. या साहित्य अनुजांच्या निर्माणक्षमतेतून आणखी नवीन, अपूर्वाईची चीज निर्माण करण्याचा हा वेगळा प्रयत्न आहे. या तीन साहित्यिकांच्या साहित्यकृतींची चिकित्सा करणे, त्यांचे मूल्यमापन करणे ही ‘सहोदर’ ची निर्मितिरेखा नाही. आरती प्रभु-ग्रेस आणि जी.ए. यांच्या परस्पर प्रभावी, परस्पर प्रेरक, परस्पर पोषक निर्मितितत्त्वांचा शोध आणि वेध घेणे, ही ‘सहोदर’ ची लेखन प्रेरणा आहे. पूर्ण झालेल्या साहित्यकृतीचे नव्याने अवलोकन करून नवा निर्मितिबंध प्रस्थापित करणे, ही ‘सहोदर ‘ची बीजभूमी आहे. 

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : डॉ. माधवी वैद्य  (Dr Madhavi Vaidya)
Binding :   Paperback
ISBN No :   9788195142729
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) : 377gms
Width  :  21.2
Height :  14
Length :  1.5
Edition : 1
Pages :  344


Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

सहोदर (Sahodar)

Rs. 380.00 Rs. 342.00