विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे - अवैवाहिक मुक्त शरीरसंबंध की फक्त वैवाहिक संबंध ?हा प्रश्न गेले काही सहसके मानवी जीवनाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही .जेव्हा हे अवैवाहिक मुक्त संबंध स्वखुशीचे असतात ,तेव्हा ते नैसर्गिक आणि म्हणून नैतिकच असतात.’विवाह’ हा पितृत्व ओळखता येण्यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीमधील, एक हेतुत: योजलेला उपाय,म्हणून त्याकडे पाहता यायला पाहिजे.ती काही निसर्गातून रूढ झालेली तरतूद नाही .नैसर्गिक नसल्यामुळे ‘विवाह ‘ हा नेहमीच एक ‘करून’ पाहण्याचा प्रयोग होऊन राहिलेला आहे.
परस्पर ‘निष्ठा’हे कोणतेही मानवी शरीरसंबंध सुखकारक करणारे मूल्य आहे.विवाह चौकटीमध्ये हे मूल्य आणि त्यातून येणारी जबाबदारी बंधनकारक असते ,याची जाणीव तरुणांपाशी असायला हवी.
आजची तरुणाई यावर बऱ्याच मोकळेपणाने विचार करते आहे ,ही समाधानाची बाब आहे.लैंगिकता ,समलैंगिकता ,घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण हा चिंतेपेक्षा ,चिंतनाचा विषय आहे.
त्याकरिता प्रस्तुत पुस्तक तरुणाल योग्य दिशा देईल,असा विश्वास वाटतो
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : मंगला सामंत ( Mangla Savant )
Binding : Paperback
ISBN No : 9788187549987
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 252gms
Width : 21.5
Height : 14
Length : 0.6
Edition : 1
Pages : 195