-10%

मनोहारी (Manohari)

मनोहारी - अशक्य ते शक्य करणं, निदान कुवतीनुसार तसा अथक प्रयत्न करणं शक्य असतं हे मनोहर सप्रे यांच्या जगण्याचं सूत्र !

जगण्याला एक प्रयोगशाळा मानल्यामुळे, त्यांनी विविध क्षेत्रांत बिनदिक्कत मनःपूत विहार केला, वाटलं तेव्हा सहज प्रवेश केला,वाटलं तेव्हा तितक्याच सहजतेनं ‘एक्झिट’ घेतली. जाणीवपूर्वक विविध उपक्रम राबविले… आणि त्यातून आपसूक त्यांचं बहुपेडी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व आकाराला आलं. शासकीय अधिकारी, प्रथितयश व्यंगचित्रकार, कामगार नेता, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, काष्ठशिल्पकार, कृतिशील पर्यावरणप्रेमी, वक्ता, व्यासंगी वाचक, लेखक, विचारवंत अशा विविधांगी मुशाफिरीची ही बखर ‘मनोहारी न होती तरच नवल! ‘स्व’ची अविष्कृती या अंगान केलेलं हे ‘कॅलिडोस्कोपिक’ लिखाण, विषयांच्या विविधतेमुळे रंगीत चिंध्यांच्या समुहासारखं कोलाज वाटलं. विविध रंगांच्या तुकड्यांना एका आकृतिबंधात सूत्रबद्ध गोवलं की ती वेधक चित्रकृती होते. विविधतेत सूत्रबद्ध एकता साधणे हाच कुठल्याही निर्मितीचा मूळ अर्थ आहे. अशा अद्भुत निर्मितीच्या अनुभूतीत रसिकांना सहभागी करणं हाच सप्रेंसारख्या कलाकाराचा आटापिटा आणि त्यातलं समाधान असतं. याचा प्रत्यय देणारी अशी ही साहित्यकृती आहे. ॲरिस्टॉटलने पण म्हटलंय की ‘सद्गुण म्हणजे दोन अतिरेकातला सुवर्णमध्य!’ महामानवांचं काय असेल ते असो, पण आम्हा सामान्यांना हाच दिलासा!
--प्रभाकर (बापू) करंदीकर

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : मनोहर सप्रे (Manohar Sapre)
Binding :   Paperback
ISBN No :   9788187549956
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) : 250gms
Width  :  21.4
Height :  14
Length :  1
Edition : 1
Pages :  191

Rs. 180.00 Rs. 162.00

Out of stock

Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

मनोहारी (Manohari)

Rs. 180.00 Rs. 162.00