लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त करता येण्यासाठी शाळेत आपण निबंध लिहितो, पत्र लिहितो, बातमी लिहितो, जाहिरात तयार करतो, मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करतो, एखादा मुद्दा विस्ताराने असेल तर तो सारांश रूपाने लिहितो. अशा अनेक माध्यमातून आपण लिहित होतो.
हे जरी खरं असलं तरी कसं लिहायचं, काय नेमकं लिहायचं, किती शब्दांत लिहायचं, कोणता आशय वापरायचा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मित्रांनो, हे पुस्तक देईल. कारण लिखाणाच्या या सर्व प्रकारात आशय व अभिव्यक्ती ( मानातले मनापसून प्रकट करता येणे ) आहे ती पुस्तकातल्या धडे, कवितांशी संबंधित नाही. तर मनाला, विचारांना, कल्पनांना, भावनांना प्रकट करणारी आहे.
‘लिहूया आनंदे’ उपयोजित लेखनाच्या या सर्व प्रकारांसाठी तुमच्या बरोबर आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. आणि आपले लिहिणे आनंददायक करणार आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : रेणू दांडेकर ( Renu Dandekar)
Binding : Paperback
ISBN No : 9788193829318
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 156gms
Width : 21.5
Height : 14
Length : 0.7
Edition : 1
Pages : 112