बालपणीच विवेकानंदांच्या नावाशी ओळख झाली. मग गावाशी ओळख झाली. तेव्हा कळून चुकलं की, हा 'बाप'माणूस आहे. आणि कलंदरही. कलकत्ता विश्वविद्यालयाचा हा तरुण पदवीधर. तरुण वयातच श्रीरामकृष्णांच्या सहवासात आला. भगवी वस्त्रं धारण केली. संन्यासी झाला. पण स्वतःच्या मोक्षासाठी धडपडला नाही. अवघ्या दीनदलितांसाठी तळमळत राहिला. नुसताच तळमळत राहिला नाही, तर आपल्या गुरुबंधूंच्या सहकार्यानं रामकृष्ण मिशनची स्थापना करून प्रत्यक्षपणे लढाईत उतरला.
'बिंब प्रतिबिंब' हे नाव ज्ञानेश्वरांनी सुचवलं. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात एक ओवी आहे : उटूनि दोन्ही आरसे। वोडविलीया सरिसे। कोण कोणा पाहातसे। कल्पावें पां? |... श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद हे एकमेकांसमोर ठेवलेले दोन स्वच्छ, निष्कलंक आरसेच नाहीत काय? किंवा एकमेकांच्या जवळ ठेवलेले दोन दिवेच. कोणत्या दिव्यानं कोणता दिवा लावला हे सांगता येऊ नये, अशा प्रकारचे.
हळूच सांगतो : 'बिंब प्रतिबिंब' ही अनोखी कादंबरी मी लिहिली नाही! ....मला कुणी माध्यम बनवलं आणि का माध्यम बनवलं याची उत्तरं शोधण्यासाठी प्रत्येकाला ही कादंबरी वाचावीच लागेल.
-चंद्रकांत खोत
Publications : डिंपल पब्लिकेशन (Dimple Publication)
Author : चंद्रकांत खोत (Chandrakant Khot)
Binding : Paperback
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 755 gms
Edition : 3
Height :3.5
Lenght : 22.5
Width :15
Pages : 552