कर्करोगावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मग या पुस्तकाचा खटाटोप कशासाठी? तर कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी, हाच या पुस्तकाचा उद्देश.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, त्या धक्क्यातून सावरण्यास काही कालावधी जातो. त्या काळात, काही गोष्टी माहीत असूनही काही चुकीचे निर्णय घेतले जातात आणि मनस्तापात अधिक भर पडते. जवळच्या, लांबच्या नातेवाईकांच्या सल्ल्यांचा भडिमार होतो. स्वतःची विचारशक्ती क्षीण झालेली असते आणि मग रुग्णाबरोबरच कुटुंबीयांचीसुद्धा आर्थिक-मानसिक-शारीरिक हानी होते. हे सर्व कसे टाळावे हे सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न...
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : गीता आदिनाथ हरवंदे (Geeta Adninath Harwande)
Binding : Paperback
ISBN No : 9788195862832
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 165gms
Width : 13.9
Height : 0.7
Length : 21.6
Edition : 1
Pages : 140