Granthpremi stall at NBT Pune Book Festival! Do Visit us at Stall No - D21. All orders during NBT Pune Book festival will be shipped after 21st Dec. Customer Care (WhatsApp Only) :+91 85509 31939.
पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया (Podcasting Digital Avajachi Duniya)
Rs. 250.00 Rs. 187.00
Availability : In StockIn StockOut of stock
Description
पॉ़डकास्ट हे माध्यम गेल्या करोनाकाळात पाहता पाहता झपाट्याने लोकप्रिय झाले आहे. मराठी भाषेतील पॉडकास्टची संख्यादेखील गेल्या दोनतीन वर्षात लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यांत वैविध्यही येत आहे. पण इंग्रजी भाषेइतकी विषयांची संपन्नता अद्यापी आहे आलेली नाही. ती आणण्याइतकी क्षमता मराठी सादरकर्त्यांकडे नक्की आहे, पण माध्यमाचे आकलन आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये सगळ्यांकडे नाहीत. ती उणीव भरून काढण्यासाठी पॉडकास्ट प्रशिक्षक उज्ज्वला बर्वे आणि पुरस्कारविजेते आघाडीचे मराठी पॉडकास्टर नचिकेत क्षिरे यांनी हे पुस्तक लिहिले आहे,.
हे पॉडकास्टसंबंधीचे मराठीतले पहिलेच पुस्तक आहे. पॉडकास्ट या माध्यमाची समग्र माहिती सोप्या पद्धतीने आणि प्रवाही शैलीत पुस्तकात देण्यात आली आहे. पॉडकस्ट ऐकण्याची सवय मराठी श्रोत्यांना लागण्यासाठी श्रोत्यांच्या दृष्टीने हे माध्यम किती रंजक आहे ते या पुस्तकात विस्ताराने सांगितले आहे. केवळ पॉडकास्ट या माध्यमाची माहिती देणे एवढाच मर्यादित हेतू न ठेवता पुस्तक वाचल्यानंतर चांगले मराठी पॉडकास्ट सादरकर्तेदेखील तयार व्हावेत हादेखील लेखकांच्या मनातील हेतू आहे. त्या दृष्टीने पॉडकास्ट का सादर करावेत, ते कुणी सादर करावेत, कसे करावेत, पॉडकास्ट करण्याचे सादरकर्त्याला कोणते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे मिळतात या सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे या पुस्तकात देण्यात आली आहेत.
या पुस्तकाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. पॉडकास्ट निर्मितीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक आणि मराठीतून स्पष्टीकरण देणारे व्हि़डिओ खास या पुस्तकासाठी तयार करण्यात आले, आणि यूट्यूबवरच्या त्यांच्या लिंक्ससाठीचे क्यू आर कोड पुस्तकात देण्यात आले आहेत. त्या व्हिडिओमुळे वाचकाला पॉडकास्टचे सर्व तंत्रज्ञान सहज समजावून घेता येते.
पुस्तकाच्या लेखकांबरोबर गप्पा :
Additional Information
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House) Author : नचिकेत क्षिरे , उज्ज्वला बर्वे (Nachiket Kshire , Ujvala Barve ) Binding : Paperback ISBN No : 9788195777853 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 133gms Dimensions : 21.4*14*0.8 Pages : 96