ट्रेडिंग हे ८० टक्के मनोरचनेवर आणि २० टक्के वैयक्तिक शिस्तबद्ध पद्धतीवर अवलंबून असतं हे समजून घेणं ही यशस्वी ट्रेडर होण्यासाठी करावयाची पहिली गोष्ट आहे. अत्यंत यशस्वी ट्रेडरना हे नक्कीच माहीत असतं. वस्तुनिष्ठ आणि निर्भय मनोरचना ही इक्विटी वक्राचा वाढत चाललेला आकार तसाच राखण्याची गुरूकिल्ली असते, हे त्यांना समजलेलं असतं. म्हणूनच आपली स्वतःची मनोरचना व्यवस्थितपणे समजलेला ट्रेडर आपल्याकडच्या सर्वसामान्य मूलभूत आणि तांत्रिक माहितीच्या जुजबी आधारावरही बाजारात सातत्यानं जिंकत जातो.
'द डिसिप्लिन्ड ट्रेडर' मुळे ट्रेडरना बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींना आणि संर्धीना उचित व आपल्याला लाभदायक ठरणारा प्रतिसाद देण्याच्या महत्त्वाच्या विचारप्रक्रिया आणि कृती शिकण्यास मदत होते. अनुभवी ब्रोकर, फ्युचर्स ट्रेडर आणि ट्रेडिंग प्रशिक्षक मार्क डग्लस यांनी त्यांच्या सुरुवातीच्या ट्रेडिंगविषयक अनुभवांवर सखोल विचार केला. त्यानंतर बहुतेक ट्रेडरना ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं ती आव्हानं त्यांनी शोधून काढली आणि त्यांना तोंड दिलं. यालाच ते आपल्या स्वतःविषयीची 'जाणीव जबरदस्तीनं करून घेणं' भाग पडणं असं म्हणतात.
शेअर बाजार हे एक 'पर्यावरण' आहे (फक्त वातावरण नाही) आणि तिथे आधुनिक सामाजिक जीवनात आणि समाजात इतरत्र आढळणारे नेहमीचे निबंध, दबाव नसतात. म्हणून शेअर बाजारात या बाधांची फिकीर न करता प्रत्येक ट्रेडरला त्याला स्वतःला हवी असलेली फलनिष्पत्ती मिळवण्याचं स्वातंत्र्य असतं. आपल्या लक्षात हे कसं आलं त्याचं डग्लस परीक्षण करतात. शिवाय ते वाचकांनाही ती प्रक्रिया स्पष्ट करून सांगतात.
ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते. 'द डिसिप्लिन्ड ट्रेडर' हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करत.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : मार्क डग्लस (Mark Douglas)
Binding : Paperback
ISBN No : 9788119812103
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 283gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 315