-15%

गुलाबराव महाराजांची विचार संपदा (Gulabrao Maharajanchi VicharSampada)

सांख्यशास्त्र सेश्वर की निरीश्वर असा बाद असला तरी 'ईश्वर नाही, असे निश्चयात्मक विधान यात नाही. उलट स हि सर्ववत् सर्वकर्ता।। व ईदृशा ईश्वरसिद्धिसिद्धा ।। या सूत्रांवरून 'पुरूष हाच ईश्वर असू शकतो' असा ध्वनी आहे. हीच ईश्वरसिद्धी होय. सांख्यविचाराने आत्मा व अनात्मा हे समजल्यावर आत्म्याचा अनुभव येण्यासाठी योगप्रक्रिया आवश्यक ठरते.
मीमांसेने ईश्वर स्पष्ट मानलेला नसला तरी 'ईश्वरशक्ती ज्यात आहे ती शक्ती स्वीकारली असून ती अनादी असल्याचे मान्य केले आहे. उपास्यत्व ज्याचा धर्म आहे असा कोणीतरी धर्मी सांगितला आहे.' असे युक्तीयुक्तीने पटवून देतात.
न्याय हे तर्कशास्त्र असून त्याला वैशेषिक म्हणजे आयचे भौतिकशास्त्र याची जोड देऊन शास्त्रज्ञ आणि संस्कृत पंडितांनी प्रयत्न केले तर आर्यभौतिकशास्त्राची पुन्हा उन्नती होईल. आणि आपला आर्यावर्त पुन्हा उच्च स्थानावर आरूढ होऊ शकेल.
भगवंताच्या अवतार विग्रहाबाबत अद्वैत तत्त्वज्ञानात "अनध्यस्त विवर्त" या भक्तिसंकल्पनेचे नवे योगदान महाराजांनी दिले.
"ज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदाय" ही वारकरी संप्रदायाचीच शाखा असून महाराजांनी भक्तिसंप्रदायाला दिलेली देणगीच आहे. भारतीय तत्त्वज्ञान 'मी कोण' या चेतनवस्तूच्या जिज्ञासेतून तर पाश्चात्य तत्वज्ञान 'जडवस्तूच्या' संशोधनातून निर्माण झाले आहे. संतांचे मार्गदर्शन विद्वेषनाशक आणि परमार्थसाधक असते. धर्म नेहमीच व्यापक असतो तर पंथ हा धर्माच्या अंगावर स्थिर राहतो.
आपला उत्क्रांतिवाद प्रावत्निक आहे. 'नर करनी करे तो नरका नारायण हो जाय' हाच पूर्ण विकास.
'आर्य बाहेरून आले नाहीत तर भरतखंडात सुसंस्कृत माणसास आर्य म्हणत असत.' असे आर्य सर्व जगात पसरलेले होते. सुसंस्कारांचे दान म्हणजेच शिक्षण अशी शिक्षणाची मार्मिक व्याख्या महाराज करतात. हीच इतिहास लेखनाची दृष्टी असावी.

Publication : मलटीव्हर्सिटी  प्रकाशन (Multiversity Publication)
Author  :  डॉ कृष्ण घटाटे   (Doctor Krushna Ghatate)     
Language  :  मराठी ( Marathi )
Weight  :  639gms
Binding  :  Paperback 
ISBN No  :  9788193098615
Pages  :  370
Edition  : 4
Width : 17.8
Height : 1.8
Length : 24.1

Rs. 400.00 Rs. 340.00

Out of stock

Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

गुलाबराव महाराजांची विचार संपदा (Gulabrao Maharajanchi VicharSampada)

Rs. 400.00 Rs. 340.00