Description:
सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांसाठी आणि गिरीप्रेमींसाठी उपयुक्त असा आनंद पाळंदे लिखित ४ पुस्तकांचा संच
१. चढाई उतराई - सह्याद्रीतील घाटवाटांची : महाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत त्यामधील जाण्याचे मार्ग, घाटांचे एतिहासिक अवलोकन आणि सह्या्द्रीतील सर्व २२३ घाटवाटा – खिंडी / बारी / पाजा यांची संपुर्ण यादि सह हा सह्यभटक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपुर्ण ग्रंथ आहे.
२. डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू : महाराष्ट्रातील २८८, गुजरातमधील ६, कर्नाटकातील १ अशा २९५ दुर्गांचे आराखडे ह्या पुस्तकांत उपलब्ध आहे.
३. पर्वतयात्रा : हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक.
४. डोंगरयात्रा: लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात. गिर्यारोहण आणि गिर्यारोहणाचा एक खेळ म्हणून परिचय आहे. प्रथमोपचार, ट्रेकसाठी साहित्य, संभाव्य धोके आणि निसर्गात असताना विविध ऋतूत पाळले जाणारे काही नियम अशा विविध पैलूंचे ते वर्णन करतात. दुसऱ्या भागात, ते किल्ल्यांचे प्रदेशनिहाय नकाशे, प्रत्येक किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणांची माहिती देतात. सह्याद्रीतील किल्ले, सागरी दुर्ग, पर्वतीय प्रदेशातील दुर्ग अशी सूची त्यांनी दिली आहे.
Additional Info
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : आनंद पाळंदे (Anand Palande)
Binding : Paperback
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 1500gms
Width : 14
Height : 6.4
Length : 21.8