Description
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दोन गटात स्पष्टपणे विभाजन करता येते. प्रथमदर्शनी नजरेस येणारे असतात ते कणभर काम करून त्या कामाची मणभर जाहिरात करणारे, सातत्याने प्रकाशात राहण्याची, पहिल्या रांगेत स्थान मिळवण्याची आणि सन्मान मिळविण्याची कला साध्य झालेले. त्यांची कार्यकर्तागिरी यासाठीच असते जणू दुसरा गट असतो, हाडाच्या कार्यकर्त्यांचा. ते जन्मालाच यासाठी आलेले असतात. त्यामुळे निरलस भावनेने समाजासाठी काम करत राहणे, हाच त्यांचा कुळधर्म असतो. क्षेत्र कुठलेही असो, काम करावे, संस्था उभ्या कराव्यात, त्यांना बळ द्यावे, त्या व्यक्ती, त्या संस्था सक्षम झाल्या आहेत, याची खात्री होताच अलगदपणे बाजूला व्हावे आणि शेवटच्या बाकावर जाऊन बसावे हाच त्यांच्यातील कार्यकर्ता असण्याचा मूलाधार असतो. यातून काही मिळवावे ही भावना त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही.उलटप्रसंगी स्वतःच्या खिशाला झळ लावून, स्वतःच्या घासातील घास गरजवंताला देऊन त्यांची वाटचाल चालू असते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर झळकणारे हसू, आनंद हीच त्यांची कमाई असते. या गटात माझा स्नेही गुलाब आहे, याचा मला अभिमान आहे.
- दिलीप नाईक निंबाळकर
Additional Information
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House)
Author : संपादन - मोहिनी मेढेकर ( Mohini Medhekar )
Binding : Paperback
ISBN No : 9788198154033
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 63 gms
Width : 14
Height : 0.5
Length : 22
Edition : 01
Pages : 96