Description
आदिवासी साहित्य परिषद, महाराष्ट्र (नागपूर) ही संस्था २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली असून आजपर्यंत या परिषदेने सहा आदिवासी साहित्य संमेलने पार पाडली आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी साहित्यिकांना एकत्र आणून ऋषी मसराम, बाबुराव मडावी वगैरे मंडळींनी या संस्थेची स्थापना १९७९ साली केली. आज महाराष्ट्रात अनेक साहित्यप्रवाह उदयाला आले आहेत. त्यात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, गुराखी साहित्य, अहिराणी साहित्य, कामगार साहित्य, (मराठी) ख्रिस्ती साहित्य, जैन साहित्य, बालसाहित्य, स्त्री- साहित्य या बरोबरच आदिवासी साहित्य उदयाला आले आहे. मराठी साहित्यात आदिवासी साहित्याने अद्यापही बाळसे धरलेले नाही, परंतु आदिवासी साहित्य सबळ आणि समृद्ध व्हावे असा आदिवासी साहित्यिकांचा प्रयत्न आहे. तो सुदिन निश्चित येईल असा आदिवासी लेखकांना विश्वास आहे. आता कुठे आदिवासी वाचू लागले आहेत, लिहू लागले आहेत. त्यांच्या जाणीवा त्यांच्या लिखाणातून प्रगट होत जातील तशतशा त्या प्रगल्भ होतील आणि हे कालानुरूप घडत जाईल असा आत्मविश्वास आदिवासी लेखकांमध्ये निर्माण होत आहे. ही वाढ निकोप, सबळ आणि समृध्दिवर्धक व्हावी म्हणून गेल्या सहा संमेलनांतील नव्या जाणिवांना उजाळा देण्याच्या निमित्ताने संमेलन अध्यक्षांची भाषणे एकत्रित करून ती पुस्तकरूपाने आदिवासी साहित्यिकांपुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ गोविंद गारे ( Dr Govind Gare )
Binding : Paperpack
ISBN No : 8188764205
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 118
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 02
Pages : 110