पण देवाच्या नावाखाली समाजाला आपल्या तालावर नाचवणे, महिलांवर अत्याचार करणे, असे त्यांचे उद्योग सुरु असतात. यातूनच पोतराजाच्या प्रथेचे पालन करायला लावल्यानंतर मरीबाच्या संसाराला घरघर लागते. मरीबाचा भाऊ शंकर या प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी संघटना उभी करतो व पोतराज झालेल्या आपल्या पुतण्याला रघुला यापासून दूर नेतो. आयुष्यातील ही नवी पहाट रघूला समाधान देते. देवाच्या नावाने चाललेला खेळ कसा घातक आहे, हे यातून दिसते.
ही कादंबरी अतिशय छान आहे. लेखक सोपान खुडे यांनी ग्रामीण भागातील पोतराज पंथाचे वर्णन अतीशय बारकाईने केले आहे. पोतराजा चे जीवन व त्यांची समाजाकडून होणारी पीळवणुक व पोतराज अंधश्रध्दे तुन कसा मुक्त होतो. ईच्छा नसताना सुध्दा पोतराज का व्हावे लागते याचे हुबेहुब वर्णन या कादंबरी मध्ये सोपान खुडे सर यांनी केले आहे. आजही काही दलित समाजामध्ये ही प्रथा चालू आहे त्यामुळे दलित समाजातील विशेष करून तरुणांनी ही कादंबरी आवश्य वाचावी. यातुन भरपुर काही शिकण्यासारखे आहे.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging