प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ. भी. रा. आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. आंबेडकरांना जन्मभर साथ केलेला आणि त्यांच्यासोबतच अस्ताला गेलेल्या क्षणभंगूरतेचे पुनरुज्जीवन हा यामागचा उद्देश आहे. यात त्यांचं ग्रंथालय आणि पुस्तके जमवण्यातला आनंद आहे; त्यांची रांगडी विनोदबुद्धी आहे; त्यांना पहिल्यांदा समोरासमोर बघण्याची झिंग आहे आणि उन्हाळ्यातल्या वावटळीदरम्यान त्यांचा व्हॉयलीनचा सराव अनुभवण्याचा आनंद, असं सगळं आहे. इथे आपल्याला भेटतात; त्यांचे सेवेकरी, प्रशंसक आणि साथीदार. यातील कुणी त्यांच्या शेरवानी आणि कुर्त्याच्या, धोतराच्या आणि लुंगीच्या प्रेमाबद्दल बोलतं तर कुणी अगदी त्यांच्या अचानक उतू जाणाऱ्या इलास्टिक चड्डीवरच्या प्रेमाबद्दलसुद्धा! इथे आपल्याला भेटणारे आंबेडकर हे कुत्र्यांवर प्रेम करणारे आणि वेगवेगळ्या आकाराची फाऊंटन पेन्स आवडणारे आहेत. यातील आंबेडकर हे लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधके यांचे पुरस्कर्ते आहेत. इथे भेटणारे आंबेडकर मद्यपान आणि वस्तूंचे प्रदर्शन याचा निषेध करणारे आहेत. इथे भेटणारे आंबेडकर प्रसंगी आचारीही आहेत. या पुस्तकात ज्या अनेक धाग्यांतून त्यांचे चित्र तयार होते, त्या धाग्यांतून आणि तुकड्यांतून त्यांच्या अनेक कला, कौशल्ये आणि लकबींचे पुनरुज्जीवन होते आणि हा आंबेडकर यांच्या शोधाचा समृद्ध करणारा प्रवास बनून जातो.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अमृता देसर्डा / निखिल घाणेकर
Binding : Paperback
ISBN No : 9788194129868
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 210 gms
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 02
Pages : 223