Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा त्या त्या राज्यातील भाषेत प्रसिद्ध होणे आज गरजेचे आहे. झुंडशाही, पुनरुज्जीवनवाद, मूलतत्त्ववाद यांच्याशी व्यवहारात जसा लोकशाही समाजवादी शक्तींना सामना करावा लागेल तसाच वैचारिक सामनाही करावा लागेल. व्यवहाराला विचारांचे पाठबळ नसेल तर व्यवहार दिशाहीन होण्याचा फार मोठा धोका असतो. या पुस्तकात आवश्यक तेथे मूळ ग्रंथातील अवतरणे तळटीपा म्हणून दिलेली आहेत. हेतू हा की भाषांतर सदोष असेल तर मूळ अवतरण वाचकांना बघता यावे. आपल्या मातृभाषेत इतर भाषांतून प्रवाही आणि निर्दोष भाषांतर कसे करावे, हा एक जिकिरीचा प्रश्न आहे. त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तसे ते पाहिले जावे, अशी मनोमन इच्छा आहे. बाबासाहेबांचे जे वाङ्मय आजपर्यंत मराठीत आले आहे तेसुद्धा एकदा तपासून पाहण्याची आणि जे आले नसेल ते आणण्याची नितांत गरज आहे. श्री. गौतम शिंदे यांच्यासारख्या या क्षेत्रातील तरुण जाणकाराने 'फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम' चे केलेले भाषांतर हा एक उत्साहवर्धक प्रयत्न आहे, असे वाटते. या कामाचे क्षेत्र अधिक विस्तृतः झाले तर त्याचा अनन्यसाधारण उपयोग होईल
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ रावसाहेब कसबे ( Dr Raosaheb Kasabe )
Binding : Paperpack
ISBN No : -----
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 83
Width : 22
Height : 0.5
Length : 14
Edition : 01
Pages : 75