Description:
सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांसाठी आणि गिरीप्रेमींसाठी उपयुक्त असा आनंद पाळंदे लिखित ८ पुस्तकांचा संच
१. डोंगरयात्रा : लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही
ओळख करून देतात. दुसऱ्या भागात, ते किल्ल्यांचे प्रदेशनिहाय नकाशे, प्रत्येक किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणांची माहिती देतात. सह्याद्रीतील किल्ले, सागरी दुर्ग, पर्वतीय प्रदेशातील दुर्ग अशी सूची त्यांनी दिली आहे.
पृष्ठ संख्या - ४२२
किंमत-४०० रु
२. डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू : दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती
पृष्ठ संख्या - ४८०
किंमत ५२० रु
३. चढाई उतराई - सह्याद्रीतील घाटवाटांची : महाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत त्यामधील जाण्याचे मार्ग, घाटांचे एतिहासिक अवलोकन
आणि सह्या्द्रीतील सर्व २२३ घाटवाटा – खिंडी / बारी / पाजा यांची संपुर्ण यादि सह हा सह्यभटक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपुर्ण ग्रंथ.
पृष्ठ संख्या - २७२
किंमत ४५० रु
४. पर्वतयात्रा : हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक.
पृष्ठ संख्या - १४०
किंमत २०० रु
५. बेस कॅम्प वरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून!२३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी
आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे पुस्तक!
पृष्ठ संख्या - २७२
किंमत ४५० रु
६. दुर्ग सिंहगड : दुर्ग सिंहगडाचे अचूक स्थलवर्णन,इतिहास,सिंहगडाचे पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देऊन गडाबद्दल आपुलकी निर्माण करणारे पुस्तक.
पृष्ठ संख्या - ५८
किंमत ८० रु
७. दुर्ग पुरंदर : दुर्ग पुरंदरचे अचूक स्थलवर्णन, वास्तु, इतिहास, पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देणारे पुस्तक.
पृष्ठ संख्या - ६४
किंमत १०० रु
८. भारतातील विश्ववंद्य वारसा स्थळे: युनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या ९१३ स्थळांपैकी २८ स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तू आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली
अरण्यस्थळे आहेत.
पृष्ठ संख्या - ९६
किंमत २०० रु
Additional Info
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : आनंद पाळंदे (Anand Palande)
Binding : Paperback
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2500gms
Width : 14
Height : 12
Length : 25