Description
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. सोमनाथ कदम या तरुण लेखकाने अण्णाभाऊंच्या साहित्यातील विविध पैलूंचा शोध 'अण्णा भाऊ साठेः साहित्य आणि तत्त्वज्ञान' या पुस्तकात घेतला आहे. प्रबोधनकारी विचारवंत, जागतिक घडामोडींचे भाष्यकार, मराठी साहित्याचे विचारविश्व आणि अनुभवविश्व समृद्ध करणारा कलावंत तसेच समतावादी लढ्यातील नेते अशा अनेक अंगाने अण्णाभाऊंचे कर्तृत्व यात साकार झाले आहे. डॉ. सोमनाथ कदम यांचे लिखाण वाचत असताना त्यांची परिवर्तनवादी संवेदनशीलता जाणवलीच पण समाज परिवर्तनाच्या लढ्यातील जे अग्रणी आहेत मग ते साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील असो, त्यांना एका सूत्रात गोवून ती जी वैचारिक परंपरा आहे ती समृध्द करण्याचे कार्य या पुस्तकाने केले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या एकूणच जीवननिष्ठेचा आढावा लेखकाने घेतला असून अण्णाभाऊंना अभिप्रेत असलेल्या जीवनमूल्यांना उजागर करण्याचा प्रयत्न निश्चितच अण्णाभाऊंच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम देणारा आहे.सोमनाथ कदम यांची या अगोदरची पुस्तकेही समाजनिष्ठ आणि परिवर्तनाच्या लढ्याचे भान जपणारे आहेत. 'अण्णा भाऊ साठे : साहित्य आणि तत्त्वज्ञान' हे पुस्तकही तीच जीवनधारा पुढे नेणारे आहेच; पण त्यांच्या संशोधन व अभ्यासूपणाचा प्रत्यय देणारेही आहे.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ सोमनाथ कदम ( Dr Somnath Kadam )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914899
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 138
Width : 22
Height : 0.5
Length : 14
Edition : 01
Pages : 118