१९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. जेव्हा त्यांनी मांडलं की, 'जातींची अनैतिक व्यवस्था ही वेद आणि शास्त्रांनी टिकवलेली आहे आणि त्यांना सुरूंग लावल्याशिवाय कुठल्याही सुधारणा होऊ शकत नाहीत', तेव्हा या गटाने आपलं निमंत्रण मागे घेतलं. त्यासाठी तयार केलेलं आपलं भाषण डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर प्रकाशित केलं. या डिवचणीला महात्मा गांधींनी प्रत्युत्तर दिलं. हा बाद कधीच संपला नाही.
ही नबी, टिपणांसह आलेली सुधारित आवृत्ती या बादावरील अरुंधती रॉय यांची एक समावेशक प्रस्तावना देते. 'आंबेडकरांविषयी लिहिताना गांधींकडे दुर्लक्ष करणं हे आंबेडकरांसाठी हानिकारक आहे', असं त्या म्हणतात. या आवृत्तीने भारतीय समाजातील राजकीय प्रतिनिधित्व, जात, विशेष अधिकार आणि सत्ता यांच्याबद्दल अपरिहार्य असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
'ॲनहिलेशन ऑफ कास्ट' हा शांततेचा भंग आहे.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : शितल भांगरे [ Shital Bhangare ]
Binding : Paperback
ISBN No : 978-81-952195-7-5
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 324 gms
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 02
Pages : 368