Description
संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय् ?
संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? जीवन एखाद्या मैफलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. या अवाढव्य रंगमंचावर आपली 'एन्ट्री' मध्येच केव्हातरी होते आणि 'एक्झिट'ही. हे नाटक किती वर्षांचं, ते माहीत नाही. चाळिशी, पन्नाशी, साठी, सत्तरी... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार की जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंदत्व ? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा... किती सांगावं ? कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं; पण त्या सहा छिद्रांतून संगीत जन्माला येत नाही. षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात. स्वतःला काहीही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही. तरी माणसं संसार सजवू शकत नाहीत.
आपण सारे अर्जुनच
Additional Information
Publications : मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehata Publishing House )
Author : व पु काळे ( V.P. Kale )
Binding : Paperpack
ISBN No : 9788177667509
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 160 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 2
Pages : 140