Description
आत्रेयादि महींचा याप्रमाणे आदरपूर्वक उल्लेख करून वाग्भटाचार्यांनी त्यांचे आयुर्वेदातील निर्विवाद वर्चस्व स्पष्ट केले आहे. चरकसंहिता व सुश्रुतसंहिता या बृहत्त्रयीमधील २ ग्रंथांमध्ये पसरलेले अथांग ज्ञान वाग्भटाचार्यांनी अत्यंत कल्पकतेने व उत्तुंग प्रतिभेने अष्टांगहृदय या ग्रंथात श्लोकबद्ध केले आहे. अष्टांगसंग्रहात म्हटल्याप्रमाणे या ग्रंथाचेही आगमप्रामाण्य सिद्ध आहे. संक्षेपार्थ अन्यथा क्रम केलेला आहे. वाग्भटाचार्यांच्या सूत्रस्थानाचे श्रेष्ठत्व या विशिष्ट अन्यथा क्रमातही दडलेले आहे. कोणतेही शास्त्र सखोल समजण्यासाठी त्या शास्त्राची परिभाषा समजणे अत्यावश्यक असते. आयुर्वेदशास्त्राच्या नवीन विद्यार्थ्यास आयुर्वेद समजण्यासाठी आयुर्वेदाची परिभाषा समजणे आवश्यक आहे. वाग्भटाचार्यांनी सूत्रस्थानामध्ये असंख्य संज्ञांची ओळख अभ्यासकास करून दिलेली आहे आणि या सर्वांना आगमप्रामाण्य आहे.
Additional Information
Publications : मनकर्णिका पब्लिकेशन (Mankarnika Publication)
Author : वैद्य दि .प्र. गाडगीळ ( D.P.Gadgil )
वैद्य यश . श्री . जोशी ( Yash Shree Joshi )
वैद्य सचिन कुलकर्णी ( Sachin Kulkarni )
Binding : Paperback
ISBN No : 978-81-938509-2-3
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 1100 gms
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 09
Pages : 452