Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेल्या 'अन्टचेबल्स, हू वेअर दे अँड हाऊ दे बिकेम अन्टचेबल्स?' या ग्रंथाचा हा समग्र मराठी अनुवाद आहे. सदर अनुवाद मराठी भाषेचा सामान्य वाचकवर्ग लक्षात ठेवूनच करण्यात आला आहे. अनुवादाची भाषा सुटसुटीत, बाळबोध व अडाणी माणसांसही समजेल अशा बेताने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच मूळ लेखकाच्या-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्लिश भाषेचा भारदस्तपणा शेवटपर्यंत राखण्याची दक्षता घेतली आहे. अस्पृश्य : कोण? कोठले? हे पुस्तकामधील नाव 'अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले?' याऐवजी सुटसुटीतपणासाठी वापरले आहे. डॉक्टरसाहेबांच्या ग्रंथाचा समग्र अनुवाद सोप्या मराठीत व किमान किंमतीत जनतेपुढे सादर करण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे, असे म्हणावयास हरकत नाही. प्रिय वाचक त्याचे संतोषाने स्वागत करतील व डॉक्टरसाहेबांचे इतरही वाड्मय मराठीत आणण्यासाठी प्रोत्साहन देतील अशी आशा बाळगतो.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : Dr Babasahe Ambedkar - अनुवाद - अॅड बी.सी कांबळे (Adv B.C. Kambale )
Binding : Paper Pack
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 143
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 04
Pages : 144