Description
भंडारा जिल्ह्यातील एकोडी नावाच्या एका खेड्यात जन्म. मागील ३५ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत. नोकरी निमित्त बांदा ते चांदा प्रवास. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणाकरिता दक्षिण कोरिया या देशाला भेट व त्यावर What we can learn from South Koriya या पुस्तकाचे प्रकाशन. पर्यटनासाठी थायलंड, बँकॉक, हाँगकाँग व अमेरिका या देशांचा प्रवास. प्रखर सामाजिक जाणीवेचे कुशल प्रशासक. जुलै, २०१२ मध्ये जिल्हाधिकारी, बीड या पदावरुन निवृत्त.
जिल्हाधिकारी, बीड या पदावर काम करतांना आलेले अनुभव कथन करावे. म्हणून हा खटाटोप. गेली ३५ वर्षे प्रशासनामध्ये असल्यामुळे बऱ्याच अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बीड हे बिहार पेक्षाही वाईट आहे असे कायम सांगण्यात येत होते आणि बीडला जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा योग आला, त्यामुळे गतीशिल, प्रगतीशिल, न्यायशिल व लोकशाही प्रणीत प्रशासन असलेल्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात काय वास्तव आहे हे वाचकांच्या समोर व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर आणावे हे शुद्ध हेतू मनात ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : सदानंद कोचे ( Sadanand Koche )
Binding : Paperback
ISBN No : 9789380166759
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 150 gms
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 6
Pages : 80