Description
भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यांत बौद्धधर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे, असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्धधर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्धधर्मीय आहेत त्यांनी निदांन साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. ह्यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय ? ह्या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजीत आहे.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar )
Binding : Hard Cover
ISBN No : 9789380166452
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 515
Width : 15
Height : 2.5
Length : 22.5
Edition : 03
Pages : 454