भारतातील तीर्थयात्रा - राज्यात विविध तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत. यापैकी काही ठिकाणे ही काही संप्रदायाची किंवा काही समाजाची कुलदैवते असतात. हे संप्रदाय कोणते? तसेच विविध संप्रदायात त्याची विशेषतत्वाने पूजा का केली जाते, याचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. लेखिका गीता अदिनाथ हरवंदे यांनी यापूर्वी भारतातील तीर्थयात्रा हे पुस्तक लिहिले आहे. नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय याची माहिती; तसेच विविध दैवते आणि त्यांचे कुलाचार याचीही माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. थोडक्यात व अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रचलित आख्यायिकांचाही विचार करण्यात आला आहे. पुस्तकातून राज्यातील विविध धार्मिक क्षेत्रांची माहिती तर मिळतेच; पण त्याचा थोडक्यात इतिहासही कळल्याने या ठिकाणी भेट द्यायला हवी असे वाटते.
भारतातील तिर्थस्थळांच्या आख्यायिका ऐकतांना मला त्या थोतांड वाटतं नाही. मी त्यांचा आस्वाद घेते, त्यात काही तारतम्य असेल का म्हणून विचार करते. मानवी जीवनाशी त्याची काही संगती लावता येते का ते आजमावते.
पॅरिस विश्ववविद्यालयातील प्रोफेसर लुई रेनॉ म्हणतात पृथ्वीवरील सर्व देशांमधे भारताविषयी एक प्रकारचे प्रेम आणि आदराची भावना दिसून येते,
त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील बौद्धिक,नैतिक व आध्यत्मिक संपत्ती हे होय.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : गीता हरवंदे (Geeta Harvande)
Binding : Paperback
ISBN No : 8187549351
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 210 gms
Width : 21
Height : 14
Length : 0.7
Edition : 2
Pages : 178
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging