युनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या ९१३ स्थळांपैकी २८ स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तू आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाने आपली हस्तचित्रकारीरूपी चिन्हे ठेवलेली भीमबेटका सारखी गुहास्थळे आहेत तर इंग्रजांनी साम्राज्य विस्तारासाठी तसेच भक्कम पायाभरणीसाठी उभारलेली मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या वास्तूची नोंद आहे. हिन्दुभारताच्या सुवर्णकाळात अनेक अलौकिक कला, वास्तू, मंदिरे निर्माण झाली. विविध धर्मांच्या अनुयायांनी आपली कला, संस्कृती अशा स्थानी धर्मकल्पनांसह मुक्तपणे बहरू दिली किंबहुना आक्रमण करून आलेल्या राज्यकर्त्यांनी भव्य कलात्मक वास्तू निर्माण करून भारताच्या प्राचीन संस्कृतीशी आपलीही नाळ जोडण्यात धन्यता मानली. अशा सर्व वास्तू, स्थळे यांचा थोडक्यात सचित्र परिचय या पुस्तकात दिला आहे. भारताचा हा विविधतने नटलेला वारसा विश्ववंद्यही आहे, हे वाचून जिज्ञासू पर्यटकांना अधिकच आनंदानुभव मिळेल.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : आनंद पाळंदे (Anand Palande)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549529
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 145gms Dimensions : 21.3 * 14 * 0.6
Pages : 96 Edition : 1