Description
प्रतिभा कुणाला भेटेल, कुणावर कशी प्रसन्न होईल हे सांगता येत नाही. रवींद्र सुर्वे यांना ती तरूण वयातच भेटली. महाविद्यालयीन वयात तिने त्यांचे बोट धरले ते त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीतही सोडले नाही. त्यांच्या कौटुंबिक जीवनातही ती सहभागी झाली. 'अपेशीची फुले' 'तिने' केसात माळताच ती हसू लागते. पण आसपास पाहतांना रुळाच्या कडेला आयाभैणी डबडी घेऊन बसलेल्या आणि तरी खिडकीत बसून डिंपलच्या डायव्होर्सची ष्टोरी वाचणारी माणसे बघून त्यांची कविता "ते धन्य !" असा विषाद व्यक्त करते.
गरीबांसाठी शासनाच्या अनेक योजना असतात पण गरीबांसाठी योजलेला घास अलिकडेच अडतो हे बघून या कवि-प्रशासकाला विषाद वाटतो. त्याला माहीत आहे की "अंकलिपीत" 'च' समोर चरख्याच्या जागी चमचे आले आहेत!" "टाळले नाही कंटाळलेही नाही तरी एकमेकांना भेटल्यावर हसत नाहीत अलिकडे डोळे" याची त्याला खंत आहे. म्हणून तो स्वतःला सांगतो, "ती असेल सोबतीला तर करवाद् नकोस... जरा थांब, तिच्या पूर्वीच्या सगळ्या आठवणी स्मर!"
आयुष्याची सुमारे साठ वर्षे कविता लिहीत असूनही त्यांनी आपल्या हयातीत आपल्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध केला नाही - अनेकांनी आग्रह करूनही. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी हा संग्रह प्रसिद्ध होत आहे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली !
प्र. ना. परांजपे
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : प्र.ना.परांजपे (Pra. Na . Paranjape )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788195255337
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 350
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 01
Pages : 279