Description
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील 'भूदान चळवळ' ही पहिलीच व्यापक अहिंसक चळवळ होती. महात्मा गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार असणाऱ्या विनोबा भावे यांच्या विचारचिंतनातून स्फुरलेली ती कल्पना होती. ही चळवळ
सुचण्याचे कारण 'परमेश्वरी प्रेरणा' होती असे विनोबा म्हणत. श्रेय परमेश्वराला दिलेले असले तरी 'भूदान' या संकल्पनेच्या तत्वज्ञानाची मांडणी विनोबांनी केली. हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी, आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विनोबा भारतभर १८ वर्षे पदयात्रा करीत राहिले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात आणि गेल्या ६४ वर्षांत (१९५१ ते २०१५) विनोबांइतकी पदयात्रा केलेला अन्य कोणताही नेता आतापर्यंत झाला नाही यातच विनोबांचे वेगळेपण सामावलेले आहे. या ग्रंथात चळवळीच्या यशापयशाची चर्चा करण्याबरोबरच या चळवळीचे २१ व्या शतकात पुनरुज्जीवन करता येईल का, याचा विचार केलेला आहे. आजच्या युगातही या चळवळीचे महत्त्व कमी झालेले नाही. कायद्याच्या चौकटीत ही चळवळ पुन्हा एकदा सुरू करता येईल, असे दर्शविणारी उदाहरणे ग्रंथात दिलेली आहेत.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : गणेश राऊत (Ganesh Raut)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549789
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 435gms
Width : 21.5
Height : 13.8
Length : 2.2
Edition : 1
Pages : 300