'फोर्ड' कारखान्यात सुरूवातीला फक्त काळ्या रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला.
युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती केलं होतं. या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले.
जीन्स आणि बोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक आणि कोकाकोला, ॲमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्ड्ज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया, फेसबुक आणि टेस्ला अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या.....
जितक्या सुरस, तितक्याच शिकवणाऱ्या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी.
फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणाऱ्या यशोगाथा- अविश्वसनिय, तितक्याच थरारक !
व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्त्वं सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं

- Book Name : बोर्डरूम (Boardroom)
- Publication : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Prakashan)
- Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
- Binding : Paperback
- ISBN No : 9789391629762
- Language : मराठी ( Marathi )
- Weight : 360gms Dimension : 21.4*14*2.4
- Pages : 348 Edition : 1