Description
संभाजी महाराजांच्या कामगिरीचे विविध दृष्टिकोनांतून केलेले मूल्यमापन प्रकाशात यावे, या हेतूने आम्ही इतिहासकार, संशोधक, समीक्षक, साहित्यिक, विचारवंत, कवी, शाहीर अशा भिन्न भिन्न क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख प्रस्तुत स्मारक ग्रंथामध्ये घेतले आहेत. त्यामध्ये साकी मुस्तैदखान, खाफीखान यांसारखे मोगली इतिहासकार आहेत, वा. सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, ग.ह. खरे, पिसुर्लेकर, स.मा.गगें, द.ग. गोडसे, स.शं.देसाई, विजय देशमुख, अ.रा. कुलकर्णी, जी.टी. कुलकर्णी, व्ही.टी.गुणे, बी.के.आपटे, डॉ. कृष्ण दिवाकर इ. इतिहासकार व संशोधक आहेत; नरहर कुरुंदकर, भीमराव कुलकर्णीसारखे समीक्षक आहेत; वि.द. घाटे, गो.नी. दांडेकर, वसंत कानेटकर, शिवाजी सावंत यांसारखे साहित्यिक आहेत. वि. दा. सावरकर, अटल बिहारी बाजपेयींसारखे हिंदुत्ववादी विचारवंत आहेत आणि ग.दि. माडगूळकरांसारखे कवी / शाहीरही आहेत. याशिवाय प्रस्तुत स्मारक ग्रंथात संभाजी महाराजांच्या महत्त्वाच्या पत्रांचा, दुर्मिळ चित्रांचा, संस्कृत दानपत्राचा (मराठी अनुवाद) समावेश आहे. अभ्यासक, इतिहासप्रेमी यांच्यासाठी हा ग्रंथ निश्चितच संग्राह्य आहे.
Additional Information
Publications : मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehata Publishing House )
Author : डॉ जयसिंगराव पवार ( Dr Jaysingrao Pawar )
Binding : Paperpack
ISBN No : 9789391151201
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 790 gms
Width : 14
Height : 4
Length : 22
Edition : 3
Pages : 821