राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या विशेष दिनांचा परिचय रोचना भडकमकर यांनी ‘दिनमहिमा ‘मधून करून दिला आहे. एक जानेवारी हा जागतिक धुम्रपानविरोधी दिन असतो. धुम्रपान केल्यास काय तोटे होतात, कर्करोगाची माहिती, धुम्रपानविरोधी चळवळ आदी माहिती यात दिली आहे.
या प्रमाणे १ जानेवारी ते २४ डिसेंबर या काळात येणाऱ्या विशेष दिनांचा महिमा सांगितला आहे. महिला मुक्ती दिन, मुलभूत कर्तव्यपालन दिन, जागतिक घर दिन, राष्ट्रीय मतदार दिन , मातृभाषा दिनाचे महत्व सांगितले आहे.
महिला आरोग्य दिन, लष्कर दिन, अग्निशामक दल दिन, हास्य दिन, जागतिक संग्रहालय दिन, भूमिपुत्र दिन, मृत्युदंड निषेध दिन, काटकसर दिन, अतिस्थूलता निवारण दिन, चहा दिन आदी वर्षभरातील दिनवैशिष्ट्ये यात टिपली आहेत. त्या अनुषंगाने यातून दिलेली रोचक माहिती ज्ञानात भर टाकते.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging