Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रे, भाषणे आदी बरेच साहित्य आज उपलब्ध आहे. ज्या समाजाचा बाबासाहेबांच्या उपदेशामुळे पूर्ण कायापालट झाला त्यांना वाबासाहेब हे देवाच्या स्थानी वाटावे हे उघड आहे. त्याबाबत त्यांची व्यक्तिपूजक म्हणून संभावना करणे युक्त नाही. कारण ही त्यांची कृतज्ञताबुद्धीच आहे. हजारोंनी उच्च शिक्षण घेणाऱ्या या तरुणांना बाबासाहेबांचे जीवन आदर्श म्हणून सतत डोळ्यांसमोर ठेवावेसे वाटते. श्री. संत यांनी बाबासाहेबांच्या शब्दांतच त्यांचे चरित्र कथन करून एक वैशिष्ट्यपूर्ण चरित्र तयार केले आहे. बाबासाहेबांनी भाषणे, लेख आदींतून आपल्या चरित्राचे जे उल्लेख केले ते त्यांच्याच शब्दांत निवडून काढून एक सरस चरित्र श्री. संत गांनी उपलब्ध केले आहे. असे असूनही त्यांच्या या चरित्रात सलगपणा आहे. कोठेही असंबद्धता, विसंगती वा तुटकपणा या चरित्रात दिसत नाही.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन (Sugava Prakashan )
Author : ज.गो.सन्त( J.G. Sant )
Binding : Paperpack
ISBN No : -------
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 139 gms
Width : 14
Height : 0.5
Length : 22
Edition : 4
Pages : 135