Description
इथल्या वर्णवादाचा, जातियवादाचा अन् संरजामशाही वृत्तीचा निषेध करताना स्वतःच्याच जातीत होणारी कुचंबणा वाट्याला आलेली आमच्यासारखी अनेक गरीब कुटुंबं आजूबाजूला होती. त्यात सगळ्यात जास्त फरफट झाली ती स्त्रियांचीच. त्यामुळे मी माझ्यापरीनं अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी स्त्री उभी करण्याचा प्रयत्न केला आहे अशी स्त्री, की जिला माहिती आहे आज तिच्या अंगणात काढलेली रांगोळी उद्या पुसली जाणार आहे; तरीही लढाऊ बाणा न सोडता संकटावर कसं तुटून पडावं? कृतिशील क्रांतीची ज्योत क्षीण होऊ न देता यशाची खात्री नसलेल्या अंधारातही वाट दाखवणारी मशाल बनून कसं ढणढणत राहावं? आपल्याच हातांनी स्वतःच्या मनावर निखारे ठेवून एकट्या स्त्रीनं निर्भयपणे कसं जगावं? मायेचं एकही माणूस जवळ नसतानाही डोळ्यात पाणी न आणता आयुष्याची दीर्घकालीन लढाई न थकता कसं लढत राहावं? घरांच्या भिंतींना पोतेरा देणारे मुकाट व समंजस हात कधीकधी आई भवानीचा अवतार घेऊन अन्यायाच्या छातीत भाला कसे खुपसू शकतात? खरं तर हे सगळं शब्दात पकडणं फार अवघड अन् वेदनादायी होतं,
पण यातनांच्या वणव्यात सापडलेल्या अन् दररोज वनवास भोगूनही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अग्निपरीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांचं जगणं हेच खऱ्या अर्थानं माझ्या लेखनाला प्रेरणा देणारं ठरलं. म्हणून तर सगळं जसंच्या तसं मांडलं.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका खंबीर स्त्रीचा अनुभव आवर्जून वाचा...
Additional Information
Publications : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House )
Author : देवा झिंजाड ( Dewa Zinzad )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789394266254
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 350
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 424