Description
श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा व्यवसाय करतांना शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना, त्यांचे वडील आई व इतर सर्वच कुटुंबीय पदवीधर/ द्वीपपदवीधर असून शेतीच्या प्रकल्पात त्यांना पाठिंबा मिळाला आपल्याला आलेल्या अनुभवाच्या शिदोरीचा आस्वाद नव्याने शेती करू पाहणाऱ्या आणि फार्म हाऊस ची आवड असणाऱ्यांसाठी या पुस्तकरूपाने नव्या वाचकांना दिला आहे. हा सर्व प्रवास काही शिकवणारा तर आहेच पण त्याच बरोबर मनोरंजकही आहे. सध्याच्या काळात एकाहून अधिक सदस्य कमविणारे असतात,त्यामुळे फार्महाऊस घेण्याचे आकर्षण वाढते आहे. पण फार्म हाऊस घेतल्यानंतर पुढे त्याची चांगली देखभाल करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. नुसता पैसे पुरेसा नसतो तर चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा याची जोड महत्वाची असते. शेती करणे किंवा जपणे म्हणजे फावल्या वेळेचा उद्योग नव्हे. हे त्यांनी पुस्तकाद्वारे वाचकांच्या नजरेत आणून दिले आहे.
Additional Info
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : प्रमोद सखदेव (Pramod Sakhdev)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549901
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 140gms
Width : 14
Height : 0.4
Length : 21.5
Edition : 1
Pages : 120