Description
कहाणी ब्रम्हांडनायकाची - श्री स्वामी समर्थांची! अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्याचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले! त्यांच्या ज्ञात लीला अक्कलकोटमधील वास्तव्याच्या म्हणजेच साधारणपणे २२ वर्षांच्या असल्या तरी, त्यांचा भूतलावरील भौतिक तसेच सूक्ष्मात वावर हा साधारण ७३० वर्षे इतका दीर्घ होता !
ह्या कादंबरीचे लेखन करताना मी त्यांचे लहान बाळ होऊन, त्यांच्या कडेवर बसून, त्यांच्या ७३० वर्षांच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न कथारूपात उलगडला आहे. तुम्हां सर्वांना सुद्धा हा अद्भुत प्रवास अनुभवायचा आहे का? तुम्ही देखील बाळ होऊन स्वामी माऊलीच्या कडेवर बसा व हा आनंद लुटा ! मला खात्री आहे की स्वामी माऊलीच्या गूढ व्यक्तिमत्वाची अनुभूती तुम्हाला नक्कीच आनंद देईल ! श्री सद्गुरवे नमः अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा जयजयकार असो.
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti ) Author : सखाराम आठवले(Sakharam Aathavale )
Binding : Hard Cover
ISBN : 9788193713334
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 870
Size: 25 * 13 * 5
Edition : 13
Pages : 400