जात समजून घेताना हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकपणे गृहीत धरले जाते. तर ब्राम्हण्यवाद म्हणजे वेदांवर आधारित भारतीय संस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्यांच्या परंपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाला ही मांडणी आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच 'ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात' अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा (पारंपरिक) भारतीय समाज आणि भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनाला पर्याय देणाऱ्या, दलित चळवळीतून तयार झालेल्या पर्यायी वैचारिक मांडणीचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
अत्यंत ओघवत्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात 'दलित' ही संज्ञा जातीय उतरंडीतील सर्वांत दडपलेल्या आणि शोषित समाजांचे प्रतीक म्हणून महत्त्वाची ठरली असली, तरी आता दलित दृष्टिकोन आणि दलित राजकारणाने 'दलित' या संज्ञेची कक्षा ओलांडून जाणे कसे आवश्यक आहे, याकडे लेखिका वाचकांचे लक्ष वेधते. हिंदुत्ववाद चढाईवर असताना त्या हिंदुत्ववादाला छेद देणारे आणि त्याविरुद्ध बंड करणारे प्रवाह बौद्धमतवाद आणि पुरोगामी भक्ती चळवळींनी कसे निर्माण केले; तसेच स्त्रीवादाच्या पुरुषसत्ताकविरोधी प्राथमिक धारणांनी या हिंदुत्ववादाला आव्हान कसे दिले याची प्रभावी मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. दलित चळवळीतील अग्रणी-फुले आणि पेरियार, रमाबाई आणि ताराबाई यांच्यासह कबीर, तुकाराम आणि आंबेडकर यांच्यापर्यंत आणि अगदी गौतम बुद्धांपर्यंत सर्वांच्या सर्वस्पर्शी दृष्टिकोनाचा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे.
हिंदुत्ववादाचे दडपणूककारक घटक नष्ट करण्यासाठी आणि त्यामागील वैचारिक धारणा उखडून टाकण्याच्या प्रयत्नांत मिळालेले विजय आणि पराभव या दोन्हींचा आढावा हे पुस्तक वाचकांसमोर मांडते. त्याचप्रमाणे अशा प्रयत्नांतील नवनवे प्रयोग, नवे मार्गही हे पुस्तक समोर आणते. दलित राजकीय भूमिकांचे (स्वतंत्र) तर्कशास्त्र आणि हिंदुत्ववादाला महत्त्वाचे आव्हान उभे करणाऱ्या बहुजन समाज पक्षाचा उदय याचे विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आले आहे. या सुधारित आवृत्तीत समग्र अनुक्रमणिकाही देण्यात आली आहे.
दलित आणि दलित जातींचा तसेच जातींच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचे प्राथमिक पुस्तक आहे
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : गेल ऑम्व्हेट
Binding : Paperback
ISBN No : 9788196446116
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 155 gms
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 01
Pages : 152