जेरुसलेम तुझ्याचसाठी - जगभरातील वेगवेगळ्या देशांत विखुरलेल्या ज्यूंना अनेक ठिकाणी छळ, अत्याचारास सामोरे जावे लागले. रशियातील ज्यू धर्मियांचे चित्रण व मायभूमीकडे त्यांना लागलेली ओढ ही नंदकुमार येवले यांनी ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’ या कादंबरीतून व्यक्त केली आहे.
रशियाचे नागरिक असूनही नशिबी खडतर जीवन, दुय्यम नागरिक म्हणून मिळणाऱ्या वागणुकीने कोनेशा गावातील ज्यू कुटुंबे त्रस्त झालेली असतात. स्येना, तिची आई न्याडझाद, वडील असोलोसोराव्ह व भाऊ गुडस्टीन यांचे कुटुंब खाऊन-पिऊन सुखी असले, तरी गरीब या गटातच मोडणारे होते. सुंदर आईची अतिसुंदर मुलगी स्याना हिच्याकडे पंचक्रोशीतील मुलांचे लक्ष असे. ती एकटी दुकानात असताना त्यांचा त्रास तिला जाणवत असे. तिच्या आईलाही हा अनुभव सतत येत असे. रशियाने ज्यूंना कधीच आपले मानले नाही. त्यामुळे जन्मभूमी जेरुसलेमला जाण्याचा धाडसी निर्णय रशियातील सामान्य कुटुंबातील ज्यू नागरिक घेतात. त्यांचे नेतृत्व न्याडझाड स्वीकारते. जीवावर उदार होऊन हजारो मैल केलेल्या यातनामय व चित्तथरारक प्रवासाचे वर्णन यात केले आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : नंदकुमार येवले (Nandakumar Yewale)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549932
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 419 gms
Width : 22
Height : 14.5
Length : 2.5
Edition : 1
Pages : 320
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging