'थोडा है थोडे की जरुरत है' असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.
प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House)
Author : नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire)
Binding : Paperback
ISBN No : 9788195777822
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 340 gms
Dimensions : 21.4*13.7*1.7
Pages : 188
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging