Description
फ्रान्झ काफ्का (३ जुलै १८८३३ जून १९२४) हा ज्यू धर्मात जन्मलेला आणि जर्मन भाषेत लिहून गेलेला लेखक जन्मापासून बहुतांश काळ प्राग या चेक भाषकांची बहुसंख्या असणाऱ्या शहरात राहिला.आधुनिक साहित्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान लाभलेल्या काफ्काच्या काही हस्तलिखितांवरील मालकीबाबत इस्राएलमध्ये मोठा न्यायालयीन खटला उभा राहिला.त्या निमित्ताने लेखकाची अस्मिता, त्याच्या साहित्याचं बाजारपेठेतलं स्थान, राष्ट्रीय वारशामधलं त्याचं स्थान, संस्कृतीचा राष्ट्रवादी राजकारणासाठी होणारा वापर, असे विविध मुद्दे उपस्थित झाले.इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालय, जर्मनीतील एक साहित्य अभिलेखागार आणि या हस्तलिखितांवर ताबा राखणारी एक इस्राएली स्त्री, हे या खटल्यातले पक्षकार. न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर या खटल्याचे कोणते पडसाद उमटले, त्याआधीपासून काफ्काला नि त्याच्या साहित्याला कोणकोणत्या चौकटींमध्ये बसवण्याचे प्रयत्न झाले, यासंबंधीच्या घटनांचा नि चर्चाचा रोचक मागोवा 'काफ्काचा शेवटचा खटला' या पुस्तकात वाचायला मिळतो.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : बेंजामिन बॅलिंट( Benjamin Balint ) अनुवाद : अवधूत डोंगरे
Binding : Paperback
ISBN No : 9788199577411
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 360gms
Width : 22
Height : 14
Length : 3
Edition : 1
Pages : 290
