Description
मागणे
लाखो स्वप्ने वसतिल इतके काळिज देवा विशाल दे आव्हानांचे असंख्य काटे मार्गावर मग खुशाल दे
ध्येयपथावर प्रवास करता कष्ट भलेही अपार दे विश्वासाची अथांग शक्ती, थैर्याचे बळ अफाट दे
काळोखाने काजळलेले मेघ कितीही नभात दे त्या मेघांना उजळवणारी उन्मेषाची प्रभात दे
पदरामध्ये पराभवाचे दान भले तू भरून दे परि आशेचे मृगजळ थोडे थकल्यानंतर मनास दे
पंखांवरती तुफान झेलू इतकी शक्ती अम्हास दे उंच भरारी नभात भरता आस धरेची मनास दे
समीर जिरांकलगीकर
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : समीर जीरांकलगीकर (Sameer Jirankalgikar )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788195959372
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 450
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 03
Pages : 305