Description
सगळं कसं सहज नि स्वाभाविक असल्याचा समज. त्यात भर म्हणजे सजग नि संवेदनशील असल्याचाही समज. त्यातून आलेलं सराईतपण. पण हे सगळं समोरासमोर नि सोयीपुरतं. या सभ्य सुसंस्कृत सराईतपणाच्या आत काय सापडेल? आत पाहायची सोय कुठं आहे?
कधी आपण खिडकीतून बाहेर पाहत असतो किंवा कधी खिडकीतून आत डोकावायच्या खटपटीत असतो. पण खिडकीतून आतलं किंवा बाहेरचं दिसतं काय ? की, खिडकीत स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं ? सभ्य सुसंस्कृत सराईतपणामध्ये असं खिडकीतून आत-बाहेर पाहायची मुभा आहे काय ?
या पुस्तकात एक खून होतो, ही सनसनाटी बातमी ठरू शकते. पण त्या पलीकडे काही सुनसानपणाचे सूरही असू शकतील ना?
सूर की सुरुंग ?
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan )
Author : अवधूत डोंगरे ( Avdhoot Dongare )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713507
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 345 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 248