पत्रकारितेच्या या सर्व प्रवासात अनेक मोठ्या माणसाच्या गुणीजनांच्या मी मुलाखती घेतल्या , त्यांचे परिचय सादर केले. विविध प्रासंगिक विषयावर भरपूर लेखनही केले. त्यातील निवडक लेखन माझ्या पत्रकार जीवनातील अनमोल कमाई मी समजतो. माझ्या दृष्टीने संबंधित सर्व अनुभव, आठवणी ह्या बँकेची ‘लॉकर’ आणि ‘संपादकांच्या खुर्चीवर’ या माझ्या आधी प्रकाशित झालेल्या दोन ग्रंथामध्ये बँकेतील डिपॉझीट प्रमाणे मी जपून ठेवल्या आहेत. माझ्यापूर्ती तरी हिरे – माणके, सोने नाणे व अत्यंत महत्वाच्या कागद्पत्रासारख्यांच किमती व मौल्यवान आहेत. ‘लेखन मुशाफिरी’ मध्ये समाविष्ट केलेल्या आठवणी व परिचय अधिक नवीन लेखनासह वाचकांपुढे ठेवताना मला अत्यंत आनंद वाटतो.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : एकनाथ बागुल (Eknath Bagul)
Binding : Paperback
ISBN No : 9788193829325
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 320gms
Width : 21.6
Height : 14
Length : 1.5
Edition : 1
Pages : 240