Description
मधुरा वेलणकर-साटम या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं हे पहिलंच पुस्तक. कलाजीवनातले आणि वैयक्तिक आयुष्यातले अनेक अनुभव तिच्या संवेदनशील मनानं टिपले आहेत आणि
अगदी समोरासमोर गप्पा व्हाव्यात अशा साधेपणानं, अकृत्रिम शैलीत ते आपल्यापुढे मांडले आहेत.
व्यक्ती, प्रसंग, घटना, स्मरणरंजन अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेणारं हे स्वभावगत स्वनिष्ठ लेखन आहे.
अभिनेत्री या वलयामागील तुमच्या-आमच्यासारखीच सुख-दुःख बाळगणारी-जपणारी व्यक्ती यातून जाणवत राहते, आपली वाटते !
या पुस्तकालाही लोक आपलंसं करतील असा विश्वास आहे !!
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : मधुरा वेलणकर (Madhura Velankar )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788193699096
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 200
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 03
Pages : 144