Description
रमाईचा त्याग, सहनशीलता, कारूण्य यावर आत्तापर्यंत बरेच लेखन झाले आहे. काळीज छिन्न-विछिन्न करणारे प्रसंग रमाईवर ओढवतात. परिस्थिती तिला बालवयातच प्रौढ व्हायला भाग पाडते. बालपण जगू देत नाही. संसाराचं ओझं डोक्यावर घ्यायला लावते. रमाईसुद्धा न डगमगता परिस्थितीशी दोन हात करते. हे बळ कुठून येते? ही शक्ती कुठून येते? हे प्रश्न जेव्हा समोर उभे राहतात तेव्हा कळतं की, रमाई नुसती त्यागाची, सहनशीलतेची किंवा कारूण्याची प्रतिमा राहात नाही तर ती त्यापलीकडची आहे. असामान्य आहे, याची मला जाणीव झाली आणि माझ्या अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी लेखणी हातात घेतली.
रमाईचा शोध घेऊ लागलो. अधाशासारखा वाचू लागलो, लिहू लागलो. रमाई संबंधीचे लेखन जिथे जिथे सापडले त्यावर तुटून पडलो. ज्या ज्या ठिकाणी भला रमाई सापडली त्या त्या ठिकाणी मी स्तंभित झालो. काळीज पिळवटून निघालं.
संसाराचं ओझे डोक्यावर घेऊन आईच्या पाठीवर जाणाऱ्या बालवयातील रमाईनं बालवयातच संसाराचं सूत्र आत्मसात केलं. बालवयातच तिच्यावर हृदयाचा ठाव घेणारे प्रसंग गुदरतात. इवलंसं मन गुदमरून टाकणाऱ्या समस्या उभ्या राहतात. तेव्हा त्यावेळच्या त्या रमाईला काय वाटलं असेल? तिनं कसा सामना केला असेल ? असे प्रश्न जेव्हा माझ्यासमोर उभे राहीले तेव्हा मला हृदयाचा ठोका चुकणे म्हणजे नेमके काय होते याची जाणीव झाली. याचा अनुभव मिळाला. धडधडत्या काळजाने मी लिहित राहिलो.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : नथुराम जाधव ( Nathuram Jadhav )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789384914790
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 148
Width : 14
Height : 0.5
Length : 22
Edition : 04
Pages : 145